सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व सावंतवाडी मनसेच्यावतीने आयोजन : ५२ जणांनी केल रक्तदान
*💫सावंतवाडी दि.०६-:* शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आज मळगाव येथील शारदा विद्यालय मळगाव या प्रशालेत पार पडलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण ५२ जणांनी रक्तदान केले. कोरोना महामारीमुळे देशात निर्माण झालेल्या रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी या शिबिराचे आयोजन सह्याद्री प्रतिष्ठान सिंधुदुर्ग विभाग व महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. शिबीराचे उदघाटन मनसे जिल्हाध्यक्ष धिरज परब, सह्याद्री प्रतिष्ठान संघटक प्रकाश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी माजी सभापती राजू परब, मनसे तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे, मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे मुख्याध्यापक वैजनाथ देवण, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, पोलीस पाटील रोशनी जाधव, मळगावचे सामाजिक कार्यकर्ते मनोहर राऊळ, सुभाष नाटेकर, एकनाथ गावडे, उदय सावळ, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारीवर्ग उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर पुर्णत्वास नेण्यासाठी मनसे नेते महाराष्ट्र सरचिटणीस जीजी उपरकर आणि मनसे सावंतवाडी उपतालुकाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी सह्याद्री प्रतिष्ठानचे संघटक सुनील राऊळ, मनसे शाखाध्यक्ष राकेश परब, पांडूरंग बुगडे, सुरज सावंत, प्रकाश राऊळ, सिध्देश परब, फुकेरी आईर ग्रामस्थ, प्रणव माणईकर, प्रथमेश राणे, संदीप राऊळ व सर्व कार्यकर्ते यांनीही हे शिबीर पुर्णत्वास नेण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
