गोठणे येथील पुरव घाडी विकास मंडळाचे सचिव शंकर घाडीगांवकर यांचे निधन

*💫कणकवली ०६-:* मालवण तालुक्यातील गोठणे येथील पुरव घाडी विकास मंडळाचे सचिव तसेच क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजाच्या बोरवली विभागाचे सदस्य शंकर गोविंद घाडीगांवकर , (मुळगाव गोठणे ता. मालवण) यांचे नुकतेच मुंबई येथे हृदयविकाराने दुःखद निधन झाले . घाडीगावकर मुंबई पोलीस दलात अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले होते . त्यांनी दोन्ही संस्थांच्या माध्यमातून गावी अनेक समाज कार्ये केली होती . एकुलत्या एक पुत्राच्या विवाहाची तयारीच्या काळात त्यांचे दुर्दैवाने यांचे दुःखद निधन झाल्याने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत . घाडीगावकर यांच्या पश्चात आई , पत्नी आणि एक मुलगा आहे . मृत्यूसमयी त्यांचे वय 60 वर्षे होते . क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाजातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली .

You cannot copy content of this page