माजी सरपंच संतोष कोदे यांचे सौजन्य
*💫मालवण दि.०५-:* मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे यांच्या कडून जेवण, चहा, नाश्ता अशी मोफत सोय कक्षात रुग्णं असे पर्यंत करण्यात आली आहे. आज या योजनेचा शुभारंभ उपसरपंच दिपक सुर्वे,तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष गांवकर, दिगंबर जाधव यांच्या मार्फत झोनल आँफिसर बुटे यांच्याकडे भोजन कंटेनर देत करण्यात आला. संतोष कोदे यांच्या दातृत्वा बद्दल आभार मानण्यात आले.
