*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 79 हजार 242 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यामध्ये एकूण 9 हजार 702 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 792 जणांनी दुसरा डोस घेतला. 9 हजार 115 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 610 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 78 हजार 37 व्यक्तींनी पहिला डोस तर 24 हजार 449 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 69 हजार 936 नागरिकांनी पहिला डोस तर 8 हजार 632 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस घेतला आहे. असे एकूण 2 लाख 23 हजार 725 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 2 लाख 20 हजार 340 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 71 हजार 980 लसी या कोविशिल्डच्या तर 48 हजार 360 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 77 हजार 68 कोविशिल्ड आणि 46 हजार 657 कोवॅक्सिन असे मिळून 2 लाख 23 हजार 725 डोस देण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 8 हजार 410 लसी उपलब्ध असून त्यापैकी 5 हजार 730 कोविशिल्डच्या आणि 2 हजार 680 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 1 हजार 830 लसी शिल्लक असून त्यापैकी 1 हजार 770 कोविशिल्ड आणि 60 कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.
जिल्ह्यात 1 लाख 79 हजार 242 जणांनी घेतला पहिला डोस
