Headlines

महेश गुरव यांच्या सामाजिक कामाबद्दल समाधान आणि अभिमानही :आ.नितेश राणे

आशिये येथे शिबिरात ४७ जणांनी केले रक्तदान

*💫कणकवली०५-:* महेश गुरव मित्रमंडळाने हा रक्तदान शिबिराचा उपक्रम समाज हिताचा आहे.आमचा एक सहकारी महेश गुरव समाजसेवेसाठी धडपड करत असतो.प्रामाणिक काम करणारा एक कार्यकर्ता आहे.महेश गुरव यांच्या सामाजिक कामाबद्दल समाधान आणि अभिमानही असल्याचे गौरवोद्गार आ.नितेश राणे यांनी रक्तदान शिबिर शुभारंभ प्रसंगी काढले.आशिये येथे महेश गुरव मित्रमंडळाच्या शिबिरात ४७ जणांनी रक्तदान केले. आशिये प्राथमिक शाळा येथे महेश गुरव मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिराचे शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी व्यासपीठावर जि. प.अध्यक्षा संजना सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, उपसरपंच संदीप जाधव, माजी सरपंच शंकर गुरव, पिसेकामते सरपंच सुहास राणे, सातरल सरपंच प्रदीप राणे, कासरल सरपंच गुरुदास चव्हाण,सुशिल सावंत,विलास खानोलकर,माजी उपसरपंच प्रवीण ठाकूर,बाळा बाणे, पांडुरंग बाणे,समीर ठाकूर,निलेश ठाकूर, समीर सावंत,संतोष जाधव,संजय बाणे,अनिल गुरव,अनंत चव्हाण, समीरा ठाकूर,सुनिल बाणे आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. आ.राणे म्हणाले, राज्यात देखील ब्लड डोनेशन कमी पडत असताना आशिये गावात असा रक्तदान शिबिराचा होणारा उपक्रम कौतुकास्पद आहे. सामाजिक बांधिलकीचे असे उपक्रम महेश गुरव व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने घ्यावेत. त्यांना कायम ताकद देण्याचे काम आमदार म्हणून मी करत राहीन. आशिये गाव आणि राणे कुटुंबीय यांचे गेल्या अनेक वर्षापासून संबंध आहेत,हे गाव म्हणजे आमचा एक परिवार आहे. असे आम.नितेश राणे म्हणाले. जि.प.अध्यक्षा संजना सावंत म्हणाल्या, रक्तदान हे श्रेष्ठदान आहे, महेश गुरव मित्र मंडळाने आयोजित केलेला हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कोरोना कालावधीत खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रुग्णांना रक्ताची गरज असते,त्या कालावधीतच हे शिबिर होत असल्यामुळे त्याचा लाभ अनेक जीव वाचवण्यासाठी होईल. महेश गुरव म्हणाले, आमच्या मित्रमंडळांने हा सामाजिक बांधिलकीतुन उपक्रम केला आहे.हे रक्तदान भविष्यात अनेकांना गरजेच्या वेळी मिळेल, सर्व मान्यवर उपस्थित राहिल्याबद्दल आभार त्यांनी आभार व्यक्त केले. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी महेश गुरव मित्र मंडळाचे शिवा गुरव, सचिन गुरव, किशोर बाणे, निखील गुरव, शैलेश जाधव,सचिन गुरव यांच्यासह आशिये गावातील कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.तसेच सिंधुदुर्ग जिल्हा रक्तपेढीचे डॉ. श्रीनिवास बेळणेकर, हेमांगी रणदिवे,वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता किशोर नांदगावकर,नितीन गावकर,जोशेफ पिंटो,सुरेश डोंगरे, नंदकिशोर आडकर आदी आरोग्य कर्मचारी यांनी या शिबिरात काम पाहिले.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लाड यांनी केले.

You cannot copy content of this page