बांद्यात चित्रकला व रंगभरणा स्पर्धेचे आयोजन…!

⚡बांदा ता.२४-: सांस्कृतिक कला-क्रीडा व समाज विकास मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून चित्रकला व रंगभरणा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि. २८ सप्टेंबर रोजी सायं. ४ वाजता होणार असून विविध गटांमध्ये आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत केजी ते तिसरी, चौथी ते सातवी, आठवी ते बारावी आणि खुला गट अशा चार विभागांमध्ये विद्यार्थ्यांना व नागरिकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. केजी ते ३री गट प्रथम तीन क्रमांकांना रोख रुपये ५००, ३००, २०० व चषक, ४ थी ते ७ वी गटसाठी १०००, ५००, ३०० व चषक, ८ वी ते १२ वी गटसाठी १५००, १०००, ५०० व चषक, खुला गटसाठी ३०००, १५००, १००० व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी केदार कणबर्गी (मो. ९४२२२३९०४७) किंवा मंगलदास साळगावकर (मो. ९४२२२३९५६६) यांच्याशी संपर्क साधावा. हि स्पर्धा ओम गणेश कन्स्ट्रक्शनचे रोहन गवस व सिद्धेश नाईक यांनी पुरस्कृत केली आहे.
बांदा परिसरातील विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page