नाम.नितेश राणेंनी घेतली केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट…

रेल्वे बाबत विविध थांबा बाबत केली चर्चा:मडगाव एक्सप्रेस कणकवली तर मांडवी एक्स्प्रेस नांदगाव येथे थांबा मिळण्याची मागणी..

सिंधुदुर्ग :
दिल्ली येथे आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग व कोकणातील महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली. कोकणातील रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, सिंधुदुर्ग व परिसरातील स्थानकांवर १६ एक्सप्रेस गाड्यांचे थांबे, कोयंबतूर, नागरकोइल व मडगाव एक्सप्रेसचा कणकवली येथे थांबा, मांडवी एक्सप्रेसचा नांदगाव येथे थांबा, मडुरे व सावंतवाडी येथून विशेष गाड्या, पीआरएस काउंटर, प्रवासी सुविधा उन्नतीकरण तसेच वैभववाडी–कोल्हापूर नव्या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याची मागणी भेटीदरम्यान केली. मा. वैष्णव यांनी सदर मागण्या व प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्याची ग्वाही दिली.

You cannot copy content of this page