सत्ता स्थान काबीज करू पाहणाऱ्या नरकासुराला हरवा…

मंत्री दिपक केसरकर: जनतेला दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.३०-: आताच्या युगात नरकासुराचा हरवण्यासाठी तुम्हाला त्याच्याशी थेट युद्ध करण्याची गरज नसून, संविधानाने तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. त्याचा उपयोग करून सत्ता स्थान काबीज करू पाहणाऱ्या नरकासुराला हरवा अशी जोरदार टीका दीपक केसरकर यांनी विरोधकांवर नाव न घेता केली आहे. आज आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले की , काहीजण कवडीमोल भावाने शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेत असून, लाखो रुपये स्वतः कमवत आहेत. काहीजण बाऊन्सरचा उपयोग करून कंत्राट मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. हीच अपप्रवृत्ती आहे. आणि अपप्रवृत्ती म्हणजेच नरकासुर त्यांच्या विरोधात मतदान करून त्यांचा पराभव करा, असे आवाहन देखील यावेळी केसरकर यांनी जनतेला केले आहे. आगामी काळात आपण स्वतः येथील जनतेची सेवा करण्यासाठी काम करणार असल्याचे देखील आश्वासन दिले आहे.

You cannot copy content of this page