⚡देवगड ता.३०-: दिपावलीनिमित्त पंचायत समिती देवगड आयोजित सुर दिपावलीचा आस्वाद फराळाचा हा नाविन्यपुर्ण उपक्रम पंचायत समिती देवगड पटांगणात संपन्न झाला.या कार्यक्रमाचा शुभारंभ दिपप्रज्वलनाने पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी वृक्षाली यादव मॅडम यांच्या हस्ते झाले . त्यांनंतर कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांनी गणरायाच गीत सादर करत सुरमय संगीताची सुरवात केली . त्यांनंतर दिपावलीची महती दत्तगुरू सांगळे यांनी कथन केली . नंतर सुरमय संगीत कार्यक्रमात शिक्षक दत्तात्रय घाडी सर , विशेषतज्ञ नारायण चव्हाण सर , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे,वैशाली मेस्त्री , नितीन कोयंडे , विनायक धुरी यांनी आपल्या संगीताने साऱ्यांना मंत्रमुग्ध केले . यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी मुकेश सजगाने , कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अंकुश जंगले , शाखा अभियंता बांधकाम अनिल तांबे, अधिक्षक मेधा राणे , हवालदार अरूणा लाड आदी मान्यवर उपस्थित होते .
दैनंदिन कामाच्या तणावातुन थोडा विरंगुळा मिळावा तसेच कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना संधी मिळाली त्यामुळे कर्मचारी वर्गातुन समाधान व्यक्त करण्यात आले.
पं.स देवगड येथे सुर दिपावलीचा आस्वाद फराळाचा कार्यक्रम संपन्न…!
