खासदार नारायण राणे यांची संजू परब यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट…

खासदार नारायण राणे यांची संजू परब यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट..

⚡सावंतवाडी ता.२६-: माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे खासदार नारायण राणें यांनी आज सावंतवाडी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी सावंतवाडी येथील माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयाला भेट दिली.

यावेळी श्री संजू परब व त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांच जंगी स्वागत करण्यात आले. दरम्यान श्री राणे यांनी आज सावंतवाडी मतदारसंघातील आगामी विधानसभा निवडणुकी संदर्भात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला.

You cannot copy content of this page