शिरगाव हायस्कूलचे कोल्हापूर विभागस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश…!

देवगड (प्रतिनिधी)

सातारा येथे सुरू असलेल्या कोल्हापूर विभाग स्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगावच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर पुन्हा एकदा विजयाचा ठसा उमटवला आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शिरगावच्या दोन प्रतिभावान वेटलिफ्टर्सनी विभागात उल्लेखनीय स्थान मिळवून आपली शान राखली.


कुमार अलकेश सुधाकर तेली यांनी १९ वर्षाखालील ६१ किलो वजनी गटात विभागात द्वितीय क्रमांक पटकावला,तर कुमार मयूर भिकाजी वरक यांनी १९ वर्षाखालील ६७ किलो वजनी गटात विभागात तिसरे स्थान मिळवून शिरगावचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशासाठी मार्गदर्शक श्री. प्रवीण शेट्ये व ए. एम. गर्जे सरांचे योगदान मोलाचे ठरले आहे. एकूण ४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे या विभागीय स्पर्धेत शाळेची ११ मुले सहभागी झाली आहेत. या दमदार यशाबद्दल शिरगावच्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page