मालवण (प्रतिनिधी)
ठाकरे शिवसेनेच्या युवासेना मालवण उपतालुकाप्रमुख पदी पियुष संतोष चव्हाण यांची निवड आमदार वैभव नाईक यांनी मालवण दौऱ्यात केली. युवा सेना शहर प्रमुख मंदार ओरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते चव्हाण यांचे यावेळी अभिनंदन करून विधानसभा निवडणुकीत यशस्वी काम करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, रवी तळाशील कर, उमेश चव्हाण, भगवान लुडबे, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, गौरव वेर्लेकर, सन्मेष परब, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, निनाक्षी मेथर, रुपा कुडाळकर, दीपा शिंदे, निना मुंबरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिन्स, मेघनाद धुरी यांच्यासह अन्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
