भाजपच्या सर्व मंडल अध्यक्षांचे कार्यकर्त्यांना आवाहन:तर राजन तेली व अन्य अपक्ष उमेदवारांशी भाजपचा काही संबंध नसल्याचे केले स्पष्ट..
⚡सावंतवाडी ता.२५-: भाजपच्या नेतृत्वाखाली महायुती राज्यात निवडणुकीला सामोरे जात आहे. सावंतवाडी मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांची उमेदवारी निश्चित झाली असून, या विधानसभा मतदारसंघाची बैठक नुकतीच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीत महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक केसरकर यांना एक मताने निवडून आणण्यासाठी काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.तसेच राजन तेली व अन्य अपक्ष उमेदवारांशी भाजपचा काही संबंध नसल्याचे देखील यावेळी त्यांनी स्पष्ट केले.तरी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना प्रचंड बहुमताने निवडून आणावे असे आवाहन आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, बांदा मंडल अध्यक्ष महेश धुरी, दोडामार्ग मंडल अध्यक्ष सुधीर दळवी, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले आहे.
