⚡सावंतवाडी ता.२५-: सावंतवाडी भाजपच्या सरचिटणीस पदी आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतच नियुक्ती पत्र भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी दिल आहे. यावेळी उपस्थितांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आले. दरम्यान संजू परब यांच्यासोबत काल परीक्षित मांजरेकर व विनोद सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.त्या जागी आज त्या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सावंतवाडी भाजपच्या सरचिटणीस पदी आनंद नेवगी व सुधीर आडीवरेकर यांची नियुक्ती…
