मालवणात बजरंग दलातर्फे २६ रोजी शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन…

मालवण (प्रतिनिधी)

विश्व हिंदू परिषद अंतर्गत असणाऱ्या बजरंग दलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मालवण मध्ये शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाची साक्ष असणारी शास्त्रास्त्रे, शिवकालीन नाणी, मोडी लिपीतील ऐतिहासिक दुर्मिळ पत्रे, तसेच शिवरायांच्या गड किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शना दरम्यान सायंकाळी ५. ३० वा. व्याख्याते अभयराजे जगताप यांचे ‘छत्रपती शिवराय झाले नसते तर…’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी या प्रदर्शनास व व्याख्यानास शिवप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बजरंग दलाचे मालवण संयोजक श्रीराज बादेकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page