रात्री चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या परप्रांतियाला दिले पोलिसांच्या ताब्यात…

बांदा/प्रतिनिधी
बांदा खामदेव नाका येथे निलेश पटेकर यांच्या घरात चोरीच्या उद्देशाने रात्री घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला पकडून बांदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तो असंदीग्ध माहिती देत असून पोलिसांनी या युवकाची चौकशी करण्याची मागणी पटेकर यांनी केली आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गणपती उत्सवनिमित्त श्री पटेकर हे बांदा येथे होते. रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या इन्सुली येथील घराच्या मागील दरवाज्यातून युवक चोरीच्या उद्देशाने आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. मात्र लाकडी दरवाज्याला लोखंडी गेट असल्याने त्याचा प्रयत्न फसला. याची माहिती मिळाल्यानंतर श्री पटेकर हे तात्काळ घरी पोहोचले. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्या युवकाला पकडले. त्याला पहाटेच बांदा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

You cannot copy content of this page