ते पुन्हा येत असल्याने सावंतवाडीत भाजपचा जल्लोष…
मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचा नावावर शिक्कामोर्तब.. ⚡सावंतवाडी ता.०४-: मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर सावंतवाडी भाजप कडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस ‘आगे बढो हम तुम्हारे साथ है’ अशी जोरदार घोषणा देखील करण्यात आल्या.