युवतीच्या विनयभंगप्रकरणी भटवाडी येथील युवकावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
*ð«सावंतवाडी दि.१०-:* तालुक्यातील एका २१ वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी भटवाडी येथील एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री उशिरा भटवाडी परिसरात घडली. दरम्यान याठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांनी संबंधित संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. बाळकृष्ण प्रकाश चव्हाण (३१, मूळ रा. माडखोल (सध्या. भटवाडी) असे त्याचे नाव आहे. संबंधित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार सावंतवाडी पोलीस…
