सिंधुदुर्ग पोलिसांच्या शिरपेचात आणखीन एक यशाचा तुरा

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या चौकस तपासाची पोलीस दलाने अनुभवली झलक सावंतवाडीतील ट्रक ड्रायव्हर चाकू हल्ल्यातील आरोपी चौविस तासात गजाआड *💫सावंतवाडी दि.१२ प्रसन्न गोंदावळे-:* आरोपी कितीही हुशार असला तरी खाकीच्या डोळ्यात धूळफेक करू शकत नाही याचा दाखला पुन्हा एकदा सिंधुदुर्ग पोलीस स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने दिला आहे .पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या चौकस मार्गदर्शनाखाली चौफेर तपासाची सूत्रे…

Read More

कोरोनानंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालत संपन्न

*जिल्ह्यातील दाखल व दाखलपूर्व ५५६१ प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणांमध्ये समझोता;२ कोटी ५४ लाख ७२ हजार ९२३ रुपये वसूल *💫सिंधूदुर्गनगरी दि.१२-:* कोरोना कहरा नंतर आज पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व न्यायालयातून राष्ट्रीय लोक अदालत संपन्न झाली. जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये दाखल व दाखलपूर्व अशा ५५६१ प्रकरणांपैकी ४६६ प्रकरणांमध्ये आज शनिवारी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये समझोता झाला आहे. यातून एकूण २…

Read More

चाकू हल्ल्या प्रकरणी एलसीबी कडून दोन्ही संशयिताला घेतले ताब्यात

*💫सावंतवाडी दि.१२-:* शहरातील ट्रक चालकावर चाकू हल्ला केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने दोन संशयिताला आत्ताच ताब्यात घेतले आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये संबंधितांना आणण्यात आले असून पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून चोवीस तासाच्या आत पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात यश आले आहे.

Read More

वेंगुर्लेत शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त विविध क्षेत्रातील १२ व्यक्तींचा सत्कार

*💫वेंगुर्ला दि.१२-:* राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ५५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी दिली.आज कृषी क्षेत्रासह देशामध्ये जी क्रांती झाली आहे,त्याचे सर्व श्रेय माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना जाते,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा कृषिभूषण एम.के.गावडे यांनी वेंगुर्ला येथे केले. वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी-काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या…

Read More

कंटेनरच्या धक्क्याने वीज वाहिन्या जमीनदोस्त.

करूळ गावातील वीजपुरवठा दिवसभर खंडित. *💫वैभववाडी दि.१२-:* करूळ जामदारवाडी येथे मुख्य मार्गावरील वीज वाहिन्या कंटेनरच्या धक्क्याने तुटल्याने गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वैभववाडीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या कंटेनरचा करूळ बँक नजीकच्या वीज वाहिन्यांना जोरदार…

Read More

कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री वर्णी…

जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिले नियुक्तीपत्र; राजन चिके यांच्या जागी नवा तालुकाध्यक्ष दिला… *💫कणकवली दि.१२-:* भाजपाच्या शहर मंडळाचे तालुकाध्यक्ष राजन चिके यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी (शहर मंडळ अध्यक्ष) पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नियुक्ती पत्र देत निवड जाहीर केली आहे. कलमठ गावचे मिलिंद मेस्त्री…

Read More

आगामी निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांना जनता जागा दाखवेल- राजन तेली..

*💫कणकवली दि.१२-:* मालवण जलक्रीडा विषयात सत्ताधारी नेत्यांचा नाकर्तेपणा उघड झाला आहे. स्थानिक मालकांचे आमदार परवानगी असल्याचे सांगून दिशाभूल करत आहेत. आमदार वेगळे सांगतात तर मंत्री वेगळा निर्णय सांगतात तर बदल विभागाकडून लक्रीडा करणार्‍यांवर कारवाई केली जाते. सत्ताधाऱ्यांकडून स्वार्थीपणा ने केलेली बदली मॅटमध्ये गेल्यावर रद्द झाली .जिल्हा शल्यचिकित्सक बदली प्रकरणात सत्ताधारी तोंडावर आपटले आहेत. एसटी कर्मचा-यांच्या…

Read More

पाडलोसमध्ये भरदिवसा दोन भल्या मोठ्या गव्यांचे दर्शन….

नागरिकांत भीतीचे वातावरण : वनविभागाने गस्त घालण्याची मागणी *💫बांदा दि.१२-:* बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस इटलादेवी येथे आज दुपारी 3.50 वाजता दोन गव्यांनी दर्शन दिले. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी माय लेकाचा गव्याने पाठलाग केला होता. सध्या काजूचा हंगाम सुरू होणार असल्याने काजू बागायतदारांसह नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवकाळी पावसामुळे काजूचा मोहर गेल्याने उत्पन्न कमी होणार…

Read More

करिवडे येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

सावंतवाडी : कारिवडे-भोगटेनगर येथील युवकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. निखिल शामराव मुदगलकर (२२) असे त्याचे नाव असून हा प्रकार आज दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Read More

कणकवली-जानवली नदीत राष्ट्रवादी काँग्रेसने बांधला बंधारा..

राष्ट्रवादी नेते आणि नगरसेवक अबीद नाईक यांचा सामाजिक उपक्रम. *💫कणकवली दि.१२-:* कणकवली गणपती सान्यानजीक असलेली जाणवली नदीवर गेली सतत १२ वर्ष पावसाळ्यानंतर नगरसेवक अबीद नाईक माध्यमातून बंधारा बांधला जात आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. बांधाऱ्याचे रूपांतर देखील लवकरच पुलामध्ये होईल, असा विश्वास अबीद नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी…

Read More
You cannot copy content of this page