गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठीपालकमंत्री नितेश राणेंचा इशारा कोणाला..?
⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. त्या निकालात वेंगुर्ले, सावंतवाडी या दोन ठिकाणी भाजपला विजय मिळाला तर मालवण मध्ये शिवसेना आणि कणकवलीत शहर विकास आघाडी जिंकली. परंतु आता निवडणूक संपली. राजकारणापलीकडे जाऊन निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना पालकमंत्री म्हणून विकास कामांमध्ये सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची भूमिका पालकमंत्री नितेश राणे यांनी मांडली होती.
परंतु सोमवारी सकाळीच राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी एक ट्विट करत निवडणुकीतील झालेल्या काही घटनांबाबत कोणाला तरी थेट इशारा दिला आहे. त्या ट्विट मध्ये गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या वाटायला लागतात.. पण आता ती वेळ आली आहे ! असे म्हणत निवडणुकीत घडलेल्या गोष्टींवर बोलण्याचा इशारा दिला आहे. या ट्विट नंतर पालकमंत्री नितेश राणे काय बोलणार? याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे.
